बॅरेज वरील लोखंडी प्लेट्स चोरणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीस नाकाबंदी दरम्यान अटक, 7 लाखाचा मुद्देमाल जप्त.

बॅरेज वरील लोखंडी प्लेट्स चोरणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीस नाकाबंदी दरम्यान अटक.7 लाखाचा मुद्देमाल जप्त. पळून गेलेल्या आरोपींना 24 तासात अटक. औराद शहाजानी पोलिसांची कारवाई.

Police Station Aurad shahajni
Police Station Aurad shahajni

याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये होणारे चोरी व घरफोडी रोखण्यासाठी रात्रीच्या वेळेस अचानक नाकाबंदी करून वाहनांची व संशयास्पद इसमांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांचे सूचना व मार्गदर्शनात औराद शहाजानी पोलीस ठाणे हद्दीत शेळगी या ठिकाणी  दिनांक 19/07/2022 रोजी रात्री अकरा वाजल्यापासून नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यादरम्यान दिनांक 20/07/2022 रोजी मध्यरात्री  दोन वाजण्याच्या सुमारास औराद कडून निलंगा कडे जाणाऱ्या एका अशोक लेलँड कंपनीच्या मिनी मालवाहू टेम्पो बाबत नाकाबंदीवरील पोलिसांना संशय आला.

नाकाबंदी दरम्यान अटक

सदर टेम्पोला थांबून चौकशी केली असता वाहनांमधील इसमानी गाडीमध्ये ज्वारी असल्याचे सांगितले. पोलिसांनी वाहनाच्या पाठीमागील बाजूने पाहणी करत असताना वाहनातील संशयित इसम पळून गेले. वाहनांमध्ये बॅरेज वरील लोखंडी प्लेट असल्याचे दिसून आले.पळून जाणाऱ्या संशयित इसमाचा पाठलाग करून पळून गेलेल्या इसमापैकी एका इसमास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव

1) हनुमंत पांडुरंग मोरखंडे, वय 37 वर्ष, राहणार आनंतवाडी तालुका देवनी

असे सांगितले. तसेच चोरलेले लोखंडी प्लेट हे वांजरखेडा बॅरेजवरील असल्याचे सांगितले. पळून गेलेल्या साथीदारांचे नाव

1) विशाल संभाजी पाटील

2) विकास करण बिराजदार

3) एक विधी संघर्ष ग्रस्त बालक

सर्व राहणार कोराळी तालुका निलंगा असे सांगितले.

पळून गेलेल्या आरोपींना 24 तासात अटक

त्यानंतर तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा श्री.दिनेशकुमार कोल्हे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत व पोलीस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे यांची रात्रीतूनच तात्काळ दोन तपास पथके तयार करून पथकांना मार्गदर्शन व सूचना करून पळून गेलेल्या आरोपीच्या मागावर रवाना केले.

पथकाने कासारशिरशी, कोराळी तसेच उमरगा या ठिकाणी आरोपीचा शोध घेऊन पळून गेलेल्या 3 आरोपींना गोपनीय व सायबर सेल, लातूर यांच्याकडून प्राप्त तांत्रिक मदतीने शीताफीने पकडून 24 तासाच्या आत ताब्यात घेतले.

सदर प्रकरणात पाटबंधारे विभाग बीट प्रमुखांच्या तक्रारी वरून पोलीस ठाणे औराद शहाजानी येथे गुन्हा क्रमांक 151/2022 कलम 379, 34 गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून आणखीन अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील आरोपीकडून लोखंडी प्लेट्स, 1 टेम्पो , 2 मोटरसायकल असा एकूण सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आणखी गुन्हयातील मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे औराद शहाजनीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामात, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे, यांच्यासह पथकातील पोलीस अंमलदार मनोजकुमार मोरे, तानाजी टेळे, सूर्यवंशी, विष्णू गीते, गोपाळ बर्डे, श्रीनिवास चिटबोने, लतीफ सौदागर, शिवाजी जेवळे, महादेव डोंगरे, बळीराम केंद्रे, रवींद्र काळे, भाग्यश्री ठोकरे यांनी विशेष कामगिरी केली आहे.

सदर गुन्ह्यात सायबर सेल लातूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज गायकवाड , पोलीस अमलदार संतोष देवडे, प्रदीप स्वामी ,गणेश साठे ,शैलेश सुडे, महिला पोलीस अमलदार अंजली गायकवाड , पोलीस ठाणे कासारशिरसी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक डमाले, पोलीस अमलदार भीमाशंकर भोसले, विकास भोंग यांनी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!