Brahmastra Box Office Collection Day 1: बॉयकॉट गैंग वर ब्रह्मास्त्रचा जोरदार वार, पहिल्याच दिवशीच तोडले सर्व रिकॉर्ड !

Brahmastra box office collection Day 1: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला ‘ब्रह्मास्त्र‘ चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. आठ महिन्यांपासून बॉक्स ऑफिस वर मंद असलेल्या बॉलिवूड ला या चित्रपटापासून खूप अपेक्षा होत्या. आणि अपेकषेप्रमाणेच ब्रह्मास्त्र ने बॉक्स ऑफिसवर वर आपला जलवा दाखवला, आणि ब्रह्मास्त्र ने सर्वात मोठी नॉन-हॉलिडे चा रिकॉर्ड देखील बनवला. सुरवाती रिपोर्ट्स नुसार अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि रणबीर-आलिया स्टारर ब्रह्मास्त्र ने पहिल्या दिवशी ३६ कोटी च्या जवळपास कमाई केली आहे.

Brahmastra box office collection Day 1
Brahmastra box office collection Day 1

Brahmastra box office collection Day 1

अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि रणबीर-आलिया स्टारर ब्रह्मास्त्र शुक्रवारी रिलीज झाला आणि पहिल्या दिवशीपासून चित्रपटला फॅन्स कडून खूप जोरदार रिस्पॉनस मिळायला सुरुवात झाली. या चित्रपटाने अपेक्षापेक्षा ही चांगली ओपनिंग केली. पहिल्या दिवशी ब्रह्मास्त्रचे १३००० हून अधिक शो सिनेमागृहामध्ये झाले. आणि चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात ७५ कोटीची कमाई केली तर संपूर्ण भारतामध्ये ब्रह्मास्त्र ने ३६ कोटी ची कमाई केली.

बॉयकॉट गैंग वर ब्रह्मास्त्रचा जोरदार वार

चित्रपटावर #BoycottBrahmastra ट्रेण्ड चा थोडासा ही प्रभाव पडलेला दिसत नाहीये. कारण ४१० कोटीच्या बजेट मध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात ७५ कोटीची कमाई केली तर संपूर्ण भारतामध्ये ब्रह्मास्त्र ने ३६ कोटी ची कमाई केली. KGF 2 नंतर ब्रह्मास्त्र हा या वर्षीचा Most Awaited चित्रपट होता रणबीर-आलियाला एकत्र पाहण्यासाठी त्यांच्या फॅन्स मध्ये खूप क्रेझ होता, आणि हा क्रेझ बॉक्स ऑफिसच्या कलेक्शन वरून आता स्पष्ट दिसत आहे.

Also Read: Indian Cricketers GF: रिषभ पंत पासून ईशान किशन पर्यंत कोण कोणाला डेट करत आहे? पहा या खेळाडूंच्या सुंदर गर्लफ्रेंड्स

जगभरात ७५ कोटी रुपयांची कमाई

निर्माता करण जोहरने त्याच्या इंस्टाग्रावर शेअर केले की या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात ७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

बॉक्स ऑफिसवर मूळ हिंदी चित्रपटाची ही सर्वात मोठी नॉन हॉलिडे ओपनिंग आहे. संपूर्ण भारताबद्दल बोलायचे तर, नॉन हॉलिडे रिलीजमध्ये, एस एस राजामौलीच्या बाहुबली 2 चे ओपनिंग कलेक्शन ब्रह्मास्त्र पेक्षा जास्त आहे. ब्रह्मास्त्र मध्ये रणबीर-आलिया सोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय महत्वाच्या भूमिकेत आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण या चित्रपटात कॅमिओ करत असल्याची बातम्या आहेत.

कोविड 19 नंतरचा सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट 

बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या आकड्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की ‘ब्रह्मास्त्र’ हा कोविड 19 नंतरचा सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट आहे. याआधी फक्त अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’, आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ला चांगली ओपनिंग मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
बॉयकॉट गैंग वर ब्रह्मास्त्रचा वार, पहिल्या दिवशीच तोडले रिकॉर्ड !
बॉयकॉट गैंग वर ब्रह्मास्त्रचा वार, पहिल्या दिवशीच तोडले रिकॉर्ड !